Breaking: नाशिक हादरलं…नाशिकमध्ये पुन्हा खून; २ जण पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचा आलेख हा वाढताच आहे…

नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरलं आहे…

म्हसरूळ परिसरात खून झाल्याची घटना समोर आली आहे..

याबाबत प्राथमिक समजलेली अधिक माहिती अशी की, म्हसरूळ-आडगाव रोडवर थोड्या वेळापूर्वी 2 मद्यपी धिंगाणा घालत होते. त्यांच्यात वादही सुरू होते. तेथील काही नागरिकांनी त्यांना हटकले.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

त्यांना पाहून मद्यपी पळू लागले. एक इसम त्यांच्या मागे पळाला. तेव्हा मद्यपींनी त्याच्यावर हल्ला केला. वार वर्मी लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्याला यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790