नाशिक (प्रतिनिधी): सोमवारी इमारतीवरुन तोल जाऊन पडल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहिला घटना सातपूरला तर दुसरी घटना अशोक स्तंभनजीक घडली आहे.
पहिली घटना सोमवारी ११.१५ वाजता सिडको येथील सावता नगरमधील सुर्योदय कॅालनी येथे घडली. बांधकाम करत असतांना पाचव्या मजल्यावरुन ३६ वर्षाय कामगार राजनारायण राय (रा. जगताप वाडी, सातपुर) यांचा तोल गेल्याते खाली जमीनीवर पडले. त्यांच्या डोक्यात व हाताला दुखापत झाली.
त्यानंतर त्यांचे भाऊ कुमार यादव यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. येथे डॅा. शिंदे यांनी तपासून मयत घोषित केले. अंबड पोलिस स्टेशन मध्ये या घटनेची नोंद कऱण्यात आली आहे.
दुसरी घटना अशोकस्तंभ येथे घडली. ३५ वर्षीय पंकज रमेश वाघमारे (रा. महात्मा फुले शासकीय वसाहत, टिळकवाडी शरणपुर रोड, नाशिक) हे सायंकाळी महिला आश्रमच्या तिसरा मजल्यावर पत्र्याची शेड दुरुस्त करण्यासाठी गेले. या ठिकाणी त्यांचा तोल जाऊन ते तिस-या मजल्यावरुन खाली पडले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथे डॅा. पवार यांनी त्यांना मृत घोषित केले. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.