नाशिक: कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगून तब्ब्ल 9 लाखांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत पोलिसात गुन्हा दाखल न करण्यासाठी संशयिताने ऑनलाईन एकाला ९ लाखांना गंडविले. तर, घरबसल्या कामातून पैसे कमविण्याचे आमिष दाखवून दोन घटनांमध्ये सायबर भामट्यांनी सुमारे पाच लाखांची फसवणूक केली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंजिरी सतीष पाटणकर (रा. पाईपलाइन रोड, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या १५ मे रोजी सायबर भामट्याने फोनवरून संपर्क साधत कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावे पार्सल आले असून त्यात ड्रग्ज सापडले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात असल्याची भिती सायबर भामट्याने ५४ वर्षीय मंजिरी यांना दाखवली. तसेच वेगवेगळ्या लोकसेवकांची नावे सांगून आणि पोलिस बोलत असल्याचे भासवून मंजिरी यांच्यावर दबाव टाकून त्यांना गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पैशांची मागणी केली.

त्या भितीपोटी मंजिरी यांनी भामट्यास ऑनलाईन ९ लाख १ हजार ९५० रुपये पाठविले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंजिरी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790