LPG

नाशिक: लग्नास नकार दिल्याने १७ वर्षीय युवतीची आत्महत्या; युवकावर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): प्रियकराने दुसऱ्या प्रेयसीसमाेर कानशिलात लगावून मारहाण केल्यासह प्रेमात धाेका मिळाल्याने सतरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शरणपूर राेड येथे घडली. आत्महत्या केलेल्या मुलीचा प्रियकर संशयित वेदांत पाटील (वय १९, रा. सिडकाे) याला सरकारवाडा पाेलिसांनी अटक करुन त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाेंदविला आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीप्रमाणे: आत्महत्या केलेली मुलगी ही शरणपूर रोड येथील तिच्या मावशीकडे वास्तव्यास हाेती. दरम्यान, तिची ओळख मागील एक वर्षापासून संशयित वेदांत पाटील याच्याशी झाली हाेती. त्यानंतर मैत्री झाल्याने दाेघे नेहमी नाशिकमध्ये फिरायला जात हाेते. त्यावेळी मुलीच्या मावशीने सदर मुलीला संशयित वेदांतबाबत विचारणा केली असता दाेघेही विवाह करणार असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर, मुलीच्या आईने दाेघांनाही वय अठरा पूर्ण हाेताच विवाह लावून देऊ असे सांगितले हाेते व ताेपर्यंत एकमेकांना भेटू नका अशी समज दिली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन

समज दिली असतानाही वेदांत व सदर मुलगी हे दोघे भेटत हाेते, दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्यातच मागील तीन दिवसापासून दोघांमध्ये सतत भांडण सुरू होते. तेव्हा आत्महत्या केलेल्या मुलीने तिच्या मावशीला वेदांतचे दुसऱ्या मुलीशी अफेअर असून त्याने तिच्यासमाेर मला मारहाण केल्याचे सांगितले हाेते व लग्न करणार नाही असे सांगून धमकी दिली हाेती. त्यामुळे ती तणावात हाेती. तरीही वेदांत तिच्याकडे आला व त्याने तिला फिरायला चल असे म्हणून भेट घेतली हाेती. तेव्हा तिने त्याला नकार दिल्याने त्याने तिला वारंवार मारहाण केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक किडनी दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्सचा गुरुवारी (दि. १२) ‘निरामय जीवन विजय सोहळा’ !

त्यातच तिने (दि. २८) दुपारी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मनीषा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेदांतवर गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १०१/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790