नाशिक: खून झालेल्या चाैकाजवळच दहशत माजविण्याचा प्रयत्न‎: पुन्हा १५ वाहनांची ताेडफाेड‎

नाशिक (प्रतिनिधी): सिडकाेतील गुन्हेगारी राेखण्यासाठी एकीकडे पाेलिस‎ आयुक्तांनी २५ पाेलिसांचे गुडाविराेधी पथक सिडकाेत‎ तैनात केले. या पथकाने सिडकाेतील रस्त्यांवर‎ शुक्रवारी (दि. २५) सायंकाळनंतर रात्रीपर्यंत गस्तही‎ घातली.

पाेलिसांची पाठ फिरताच शिवाजी चाैकात‎ संदीप आठवले याचा दाेन दिवसांपूर्वी खून झाला हाेता‎ त्या परिसराच्या जवळच गुंडांनी तब्बल १५ वाहनांची ‎ताेडफाेड करत पाेलिसांच्या गुंडाविराेधी पथकाला‎ आव्हानच दिले.

दरम्यान, या घटनेमुळे छत्रपती ‎शिवाजी महाराज चाैक परिसरात नागरिकांमध्ये भीती‎ पसरली आहे. सिडकोतील छत्रपती शिवाजी‎ महाराज चाैक, अचानक चाैक, साईबाबा मंदिराच्या‎ मागील बाजूला गुंडांनी दहशत माजवत वाहनांवर ‎दगडफेक करत काचा फाेडल्या.‎

शुक्रवारी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान ३ ते ४ गुंडांनी‎ परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यात ३ ते ४‎ कारच्या काचा फोडण्यात आल्या. तर दुचाकी रस्त्यात ‎ढकलून त्यांचीही तोडफोड करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

काही‎ नागरिकांनी या गुंडांना हटकण्याचा प्रयत्न केला असता‎ त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. नागरिकांच्या ‎म्हणण्यानुसार १२ ते १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली‎आहे. रात्री उशीरापर्यंत पाेलिस गुंडांचा शाेध घेत हाेते.‎

सिडकाेत गुन्हेगारीवर उपाय आता‎ २५ पोलिसांचे गुंडाविराेधी पथक‎:
अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसांत सहा‎ खुनाच्या घटनांनी सिडकाे, अंबड, चुंचाळे परिसर‎हादरला आहे. या गुन्ह्यांच्या मालिकेने‎नाशिककरांमध्ये भीती पसरली आहे. तसेच‎ पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले ‎जात असल्याने आता पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे‎ यांनी तातडीने गुन्हेगारी माेडित काढण्यासाठी २५‎स्वतंत्र पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गुंडविराेधी‎पथक सिडकाेत नियुक्त केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

सहायक पाेलिस‎ आयुक्त शेखर देशमुख यांना देखील अंबड पाेलिस ‎ठाण्याच्या आवारातच तळ ठाेकण्याचे व त्यांचे‎कार्यालय शरणपूरराेड येथून अंबडलाच हलविण्याचे ‎आदेश देण्यात आले आहेत. सिडकाेतील शिवाजी‎चाैकात भरदिवसा गुरूवारी (दि. २४) संदीपआठवले‎याच्यावर दुचाकीवरून आलेल्या टाेळक्याने खून केला. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटताच पेलिस ‎यंत्रणेनेही तत्परता दाखवित या गुन्ह्यातील सहा संशयितांना अटक केली. तर तिघा‎ विधीसंर्घषीत बालकांना ताब्यात घेण्यात आले. तर टाेळक्यावर माेक्कान्वये कारवाई‎ करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या १५ दिवसात अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत‎ सहा खूनाच्या घडल्याने पाेलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले ‎जात आहे. चारच दिवसांपुर्वी मयूर दातीर या युवकाचा भरदिवसा भाेसकून खून‎ केल्याचा प्रकार घडला. यामध्ये संशयित करण कडूस्कर हा सराईत गुन्हेगार असून‎ त्याच्या विराेधात पाेलिस तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने ‎रहिवाशांनी थेट पाेलिस ठाण्यावरच माेर्चा काढला हाेता.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

पाेलिसांनी दातीर खूनातील ‎संशयित कडूस्कर व आठवलेच्या मारेकऱ्यांविराेधात माेक्का लावण्यासाठी ‎कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी राेखण्यसाठी‎ खुद्द पेालिस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त माेनिका राऊत यांच्या ‎मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.‎

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790