नाशिक: “घटस्फोट पाहिजे असेल तर ५३ लाख रुपये द्या”; सासरच्या मंडळींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल…

नाशिक (प्रतिनिधी): घटस्फोट पाहिजे असेल, तर ५३ लाख रुपयांची मागणी करीत पैसे दिले नाहीत, तर तरुणाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून नोकरी घालवण्याची धमकी देणाऱ्या सहा परप्रांतीय आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनीष राकेशकुमार गर्ग (वय ३६, रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) हे स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प येथे नोकरी करतात. गर्ग यांना संशयित आरोपी सुरेंद्रकुमार जयस्वाल, तनुषा जयस्वाल, सिद्धांत जयस्वाल, बालेश गुप्ता, सचिन पारासर (सर्व रा. डेहराडून, उत्तराखंड) व सिरील (रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) यांनी संगनमत करून “तुम्हाला घटस्फोट पाहिजे असेल, तर ५३ लाख रुपये द्यावे लागतील, तसेच पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुमची नोकरी घालवू,” अशी धमकी देऊन खंडणीच्या स्वरूपात पैशांची मागणी केली. हा प्रकार १२ मे २०२४ ते १६ ऑगस्ट २०२४ दरम्यान मुजफ्फरनगर, देवळाली कॅम्प येथे फोनद्वारे घडला.

हे ही वाचा:  Weather Alert: 27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत. (देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२९/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790