LPG

नाशिक: भांडण सोडविण्यास गेलेल्या वृध्दास टोळक्याकडून बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): रस्त्यावरील हाणामारीत मध्यस्थी करणे एका वृध्दाच्या अंगलट आली आहे. संतप्त तीन ते चार जणांच्या टोळक्याकडून वृध्दास बेदम मारहाण करण्यात आली असून हातातील कडे डोक्यात मारण्यात आल्याने वृध्द जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन

राजू बाबुलाल कुमावत (६१ रा.अंबिका स्विटमागे,अशोकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुमावत बुधवारी (दि.२५) दुपारी श्रमिकनगर भागात गेले होते. गणेश कॉलनीतून ते पायी जात असतांना ही घटना घडली. वाटेत अज्ञात तीन ते चार तरूण एका तरूणास मारहाण करीत होते. त्यामुळे कुमावत यांनी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सदर युवकास नका मारू असे म्हटल्याने संतप्त टोळक्याने त्यांच्याकडे मोर्चा वळवित त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी एकाने हातातील वजनी कडे डोक्यात मारल्याने कुमावत जखमी झाले असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790