नाशिक: टोळक्याचा पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक – पुणे रोडवरील पानटपरीवर आलेल्या संशयित टोळक्याकडे सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयितांनी हॉकी स्टीक, लाकडी दांडके, धारदार हत्याराने मारत पानटपरी चालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी टोळक्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हर्षल राजेंद्र देवरे (२३, रा. राधास्मृती सोसायटी, पाथर्डी रोड, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची नाशिक-पुणे रोडवरील घंट्या म्हसोबा महाराज मंदिराजवळ पानटपरी आहे. मंगळवारी (ता. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयित लखन काशिद (रा ट्रॅक्टर हाऊसजवळ, जुने नाशिक), क्रिश शिंदे (रा. कोळीवाडा) यांच्यासह पाच ते सहा संशयित पानटपरीवर आले. त्यासाठी संशयितांनी देवरे यांच्याकडून सिगारेट घेतल्या.

हे ही वाचा:  नाशिक: पाऱ्यात घसरण, थंडीचा जोर वाढला; नाशिकचे किमान तापमान 12.4 तर, निफाड 10.9 अंश सेल्सियस

या सिगारेटचे पैसे मागितले असता, संशयित लखन याच्यासह साथीदारांनी त्यांच्याकडील हॉकी स्टीक, लाकडी दांडक्याने आणि धारदार हत्याराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

या मारहाणीमध्ये देवरे यांच्या हाता-पायांना, पाठीला, कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर संशयितांनी पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयित टोळक्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक सुयोग वायकर हे तपास करीत आहेत. (उपननगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३२९/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790