LPG

नाशिक: पतीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या दहा लोकांवर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): पत्नी, काका, मेहुणा तसेच मित्र व सासरच्या लोकांकडून आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वारंवार वाद घालत शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक, मानसिक त्रास देत २७ वर्षीय इसमाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोडाऊनमधील ४.५ लाखांच्या वायर चोरीचा उलगडा; दोघे जेरबंद !

याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित प्रकाश बेलदार हा युवक खासगी रुग्णालयात काम करत होता. बेलदार याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात राहत्या घरी काहीतरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दिंडोरी रोडवरील साईकृपा नगर आशीर्वाद ग्लोरी इमारतीत ही घटना घडली होती.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मयत रोहित याला त्याची पत्नी संशयित दीपांजली रोहित बेलदार, सागर विठ्ठल बेलदार (काका), विजय ज्ञानेश्वर कुमावत (मेहुणा), अजिंक्य शाम धोंगडे, मंगेश गायकवाड तसेच विजय, प्रशांत, जोमान, रवि व प्रिया (पूर्ण नाव माहिती नाही) आदींनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद घातला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस सिलिंडरसाठी धडपड; पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा…

मानसिक व शारीरिक त्रास देत दमदाटी केल्याने त्याने त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. याप्रकरणी फिर्यादी वडील प्रकाश लक्ष्मण बेलदार (रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुहा रजिस्टर क्रमांक: ५४१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790