Amazon

नाशिक: अवैध सावकार देवरेविरोधात अजून एक गुन्हा; ६ लाखांच्या मोबदल्यात महिलेकडून बळकावला फ्लॅट

नाशिक (प्रतिनिधी): महिलेला ६ लाखांचे कर्ज देत ६ लाखांच्या मोबदल्यात फ्लॅटचे बेकायदेशीर साठेखत करत महिलेचा फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अवैध सावकार वैभव यादवराव देवरे याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. देवरेच्या विरोधात आजपर्यंत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. देवरेसह त्याची पत्नी सोनाली आणि शालक निखिल पवार कारागृहात आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

पोलिसांनी दिलेली माहिती आणि सविता भामरे (रा. गुलमोहर कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित वैभव देवरेकडून २०१८ मध्ये आर्थिक अडचण असल्याने ६ लाखांचे १० टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. संशयिताने तारण म्हणून फ्लॅट ठेवावा लागेल अशी धमकी दिली. कर्ज देतेवेळी फ्लॅटबाबात काही सांगितले नसताना संशयित देवरेने दमदाटी करत फ्लॅटचे बेकायदेशीर साठेखत लिहून घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

कर्जाची रक्कम फेडली असताना आणखी पैशांची मागणी करत खंडणी मागितली. कोरे चेक घेऊन पतीला शिवीगाळ करत पैसे दिले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांत तक्रार दिली तर पत्नी सोनालीच्या नावाने पतीविरोधात खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. महिलेने पोलिसांत तक्रार केली. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७४/२०२५)

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे- पालकमंत्री गिरीश महाजन

१३ गुन्ह्यांचा तपास:
वैभव देवरेविरोधात दाखल १३ गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. खंडणी आणि सावकारी कर्जाची वसुली केली असल्यास अशा नागरिकांनी वैभव देवरेच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790