HomeAd

नाशिक:  गोणीत आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

म्हसरुळ पोलीस ठाण्यात हद्दीत ही घटना घडली आहे. आज सकाळी नाशिक-दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

👉 हे ही वाचा:  सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधून अटक

हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महिलेची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790