नाशिक: सव्वा लाखांच्या मोबदल्यात उकळले आठ लाख; चार जणांविरोधात गुन्हा दाखल…

नाशिक (प्रतिनिधी): हातउसनवार घेतलेल्या पैशाची दहा टक्के व्याजाने परतफेड केल्यानंतरही थकबाकी असल्याचे कारण सांगून आठ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दशरथ साबळे (वय ४४, गंगापूर रोड, नाशिक) हे हॉटेलचे वेटर म्हणून काम पाहतात. साबळे यांनी दि. ५ मार्च २०१६ रोजी आरोपी सुनील महाजन यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये १० टक्के व्याजाने हातउसनवार घेतले होते. त्या रकमेपोटी दि. ५ मार्च २०१६ पासून २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी साबळे यांच्याकडून दहा टक्के व्याजासह ८ लाख ४५ हजार रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात आरोपी महाजन याने वसूल केले आहेत; मात्र महाजन याने या रकमेपोटी आठ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

या आठ लाख रुपयांच्या वसुलीसाठी आरोपी सुनील महाजन, ज्योत्स्ना महाजन, दीपक महाजन व महाजन यांचे चुलत सासरे (नाव, गाव व पत्ता माहीत नाही) यांनी संगनमत करून साबळे यांच्या वारंवार येऊन तगादा लावला, तसेच हे आठ लाख रुपये न दिल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी देत फिर्यादीच्या बायकोला सांभाळीन, असे सांगून साबळे यांच्या दोन्ही मुलींना जिवे ठार मारण्याची धमकी वरील चारही आरोपी देत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790