नाशिक: बोरगडला झालेल्या घरफोडीत दीड लाखाचे दागिने लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटातून सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना बोरगड येथे घडली.

फिर्यादी मंदागिनी दिलीप पगारे (रा. सूर्या सोसायटी, बोरगड, नाशिक) या त्यांची मुलगी ज्योती तुपे हिच्याकडे आडगाव येथे गेल्या होत्या. त्यावेळी ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंड तोडून व कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रदेश केला. त्यावेळी घरातील कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेली ७५ हजार रुपये किंमतीचे २ तोळे वजनाची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, २० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ६ हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, ८ हजार रुपये किंमतीचे साईबाबांचे चित्र असलेले सोन्याचे पेंडंट असा १ लाख ५९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने घरफोडी करुन चोरुन नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंदुपकर करीत आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790