नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडिता ही अल्पवयीन असून, श्रमिकनगर परिसरात राहते. संशयित आरोपी यश अभिमान सोनवणे (वय २०, रा. अंबासन, ता. बागलाण) याने भविष्यात लग्न करण्याचे आमिष दाखवून पीडितेशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही पीडितेच्या इच्छेविरुद्ध सोनवणे याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर नोकरीचे कारण सांगून तो कुठे तरी निघून गेला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात यश सोनवणेविरुद्ध लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. १६ ऑक्टोबर २०२३ ते दि. १३ जानेवारी २०२५ दरम्यान श्रमिकनगर येथे घडला.
याबाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १८/२०२५) पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक न्याहाळदे करीत आहेत.
![]()


