नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (प्रतिनिधी): दिवाळी सुट्ट्या लागण्यापूर्वीच अट्टल चोरट्यांकडून बंद घरे हेरून त्यांचे लॉक तोडून घरफोड्यांचे सत्र आयुक्तालय हद्दीत सुरू झाले आहे. पंचवटी परिसरातील म्हसरुळ हद्दीतील पोकार कॉलनीत बंद बंगला आणि पंचवटी हद्दीतील कमलनयन सोसायटीतील बंद रो हाऊसचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल साडेसात लाखांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली आहे. यामुळे ऐननिवडणुकीत पोलिसांसमोर चोरट्यांचेही आव्हान उभे राहिले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

अंत्यविधीसाठी धुळे येथे गेल्याने बंद बंगल्याचे लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल पावणे सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागदागिने चोरून नेत घरफोडी केली आहे. गौरव लक्ष्मण बोंबले (रा. स्वस्तिक बंगला, पोकार कॉलनी, गायत्रीनगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २०) भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी करीत २४ हजाराच्या रोखसह ६ लाख ७१ हजारांचे सोन्या-चांदीची दागीने चोरून नेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाचे आता रूपडे पालटणार

याप्रकरणी महसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घरफोडी पंचवटीतील अयोध्यानगर येथे झाली. सुदाम नामदेव मडके (रा. कमलनयन सोसायटी, अयोध्यानगरी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार १५ ते २१ तारखेदरम्यान त्यांच्या बंद रो हाऊसच्या दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरुममधील सुटकेसमधील ३५ हजारांची रोकड, सोन्याची अंगठी व चांदीचे जुने नाणे असा ७१ हजारांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790