नाशिक: सोसायटीत पार्किंगचा वाद: सदस्यांच्या मारहाणीत रहिवाशाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): हिरावाडी भागातील दामोदर राज नगरमध्ये सोमवारी (दि. २०) रात्री श्री केशव हरी अपार्टमेंटच्या वाहनतळात वाहने लावण्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली होती. या घटनेत बुद्धन लक्ष्मण विश्वकर्मा (४९) या इसमाला जबर मार बसून अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू ओढावल्याचे शवविच्छेदन अहवालातून मंगळवारी (दि. २१) समोर आले. पंचवटी पोलिसांनी चेअरमन संशयित वसंत घोडे विशाल घोडे व गणेश घोडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

श्री केशव हरी अपार्टमेंटमध्ये विश्वकर्मा यांचे स्वतःचे घर आहे. या अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहणारे संशयित महेश जगताप आणि वसंत घोडे यांच्यात गाडी उभी करण्यावरून रविवारी वाद झाले होते. घोडे यांनी सोसायटीची मिटिंग बोलाविली होती. मिटिंगला बुद्धन यांचा मुलगा रितेश, प्रथमेश उपस्थित होते. रात्री नऊ वाजता घोडे, विशाल, गणेश हे महेश जगताप यांच्या फ्लॅटकडे येऊन वाद घालत होते.

त्यावेळी बुद्धन यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने वाद करत विशाल मागे सरकत घरात आल्याने रितेशची आई मोना हिने विशालला ‘तुम्ही आमच्या घरातून बाहेर जा, तुमचे भांडण तिकडे करा…’ असे सांगताच विशाल हा त्यांच्या अंगावर धावत आला. त्याने मोना विश्वकर्मा यांचे केस पकडले, तर गणेशने हात पिळला व वसंत घोडेने ‘तुमचा बोलायचा व काय संबंध येतो…’ असे म्हणून सर्व जण त्यांना मारहाण करू लागले. यावेळी बुद्धन यांनी त्यांच्या पत्नीच्या बचावासाठी धाव घेतली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

दोघांची तब्येत बिघडली:
फिर्यादी रितेशने त्याच्या आईला जिल्हा रुग्णालयात हलविले असता त्याचे वडील बुद्धन यांचीही प्रकृती बिघडली रुग्णालयाच्या द्वारावरच त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे या दाम्पत्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुद्धन विश्वकर्मा यांना तपासून मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

बुक्क्यांनी मारहाण:
कुटुंबीयांनी बुद्धन यांच्या छातीवर व डोक्यात हाताच्या चापटीने, बुक्क्यांनी तर गणेशने पीव्हीसी पाईपने प्रथमेश याच्या कपाळावर फेकून मारला. या प्रकरणी रितेश बुद्धन विश्वकर्मा याने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790