नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीवर चॉपर घेवून फिरणा-या सातपूरच्या दोघांना पोलिसांनी गजाआड करुन संशयितांच्या ताब्यातून धारदार चॉपरसह दुचाकी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विक्रम राजेंद्र सुरडकर (२३ रा. माळुंजकर बिल्डींगजवळ, शिवाजी चौक सातपूर) व करण कृष्णा नागरे (२२ रा. महादेववाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित चॉपरधारींची नावे आहेत.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार अनिल महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. गंजमाळ परिसरात फिरणा-या दुचाकीस्वारांकडे धारदार चॉपर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार बुधवारी (दि.१६) पोलिसांनी धाव घेतली.
त्यानंतर खब-याने दिलेल्या माहितीनुसार संशयितांना हुडकून काढत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चॉपर मिळून आला. संशयितांच्या दुचाकीसह चॉपर जप्त करीत पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास पोलिस नाईक सचिन म्हसदे करीत आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790