नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाने मुलांना भेटण्यास आलेल्या महिलेला पतीसह सासऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार न्यायालयाच्या आवारात घडला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात खटला सुरू आहे. विवाहिता मुलगा व मुलगी यांना भेटण्याची तारीख असल्याने त्यांच्या कस्टडीबाबत कौटुंबिक न्यायालयात ‘त्या आल्या होत्या.
न्यायालयाने पतीला मुलांना न्यायालयात हजर करण्यास सांगितले. विवाहिता न्यायालय आवारात मुलांना भेटण्यास जात असताना पती, सासरे, दीर यांनी विवाहितेचे केस पकडून खाली पाडले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. झटापटीत साडी खाली ओढत विनयभंग केला. विवाहितेची आई तिची साडी सावरत असताना दिराने महिलेच्या गालात चापट मारली. या प्रकाराने न्यायालयाच्या आवारात गोंधळ झाला. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले.
![]()


