नाशिक (प्रतिनिधी): शहरातील एटीएम मशिनमध्ये रोकडचा भरणा करणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच पासवर्डचा वापर करून एटीएममधील सुमारे चार लाखांची रककम काढून घेत तिचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार गेल्या ऑगस्ट महिन्यात घडला आहे.
ऋषिकेश जयवंत जाधव ( रा. संसारी गाव, देवळाली कॅम्प) असे संशयिताचे नाव आहे. निकिता बबनराव अबुज (रा. आरटीओ लिंकरोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये रोकड लोड करण्यासाठी हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस करते. २६ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता राजीवनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशिनमध्येे पैसे भरण्यासाठी संशयिताकडे दिले होते.
त्यावेळी संशयिताने एटीएम ॲडमीन पासवर्डचा वापर करून या रक्कमेतील ४ लाख १५ हजार ३०० रुपयांची रोकड एक्सीस कॅशचे नावाने काढून घेत पैशांचा अपहार केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अपहाराचा गुन्हा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक शिरसाठ हे तपास करीत आहेत. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७२/२०२४)