नाशिक: पॉलिसीधारक जिवंत असल्याचे भासवून विमा कंपनीची 19 लाखांची फसवणूक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पॉलिसीधारक मयत असून, तो जिवंत असल्याचे भासवून एका ठगाने विमा कंपनीची १९ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

याबाबत फसवणूक झालेल्या रिलायन्स निप्पॉन कंपनीचे अधिकारी वासुदेव टिकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांच्या विमा कंपनीत विक्रमसिंग (रा. ११६, आदमपूर, राधा-राणी सिना रोड, बागलपूर) यांनी पॉलिसी काढली होती. सन २०२१ पर्यंत त्यांनी पॉलिसीचे

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

नियमित हप्तेदेखील भरले होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. ही वाव विमा कंपनीला माहीत नव्हती. एका ठगाने ही संधी साथत विक्रमसिंग हे मयत झालेले असताना त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून एका बँकेत खाते उघडले. नंतर त्याने रिलायन्स निप्पॉन कंपनीच्या पॉलिसीची सरेंडर प्रक्रिया पूर्ण करून १९ लाख ३८ हजार ८०५ रुपये त्या खात्यातून वर्ग करून त्या पैशांचा अपहार केला. हा सर्व प्रकार दि. ६. जून ते दि. २२ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला. हा सर्व बनावट प्रकार लक्षात आल्यानंतर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्याऱ्यांनी अज्ञात इसमाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोळंके करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790