नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

नाशिक (प्रतिनिधी): महिलेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पंजाबच्या इसमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी विकास अग्रवाल (वय ५४, सध्या रा. लुधियाना, पंजाब) याने पीडित फिर्यादी महिलेशी ओळख निर्माण करून तिचा विश्वास संपादन केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

त्यानंतर दि. २३ डिसेंबर २०२२ ते दि. २७ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयित आरोपी अग्रवाल याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून कामाच्या ठिकाणी, कार्यालयात, कश्यपी धरण येथे क्रेटा कारमध्ये, आनंदनगर, गंगापूर रोड येथे व राहत्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे पीडितेने आरोपी अग्रवाल याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने वचनाप्रमाणे लग्न केले नाही व आर्थिक मदतही केली नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात अग्रवाल याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790