Amazon

नाशिक: अल्पवयीन बहीण, भावावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावास !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ घरात एकटे असताना दोघांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. मलकलपट्टे-रेड्डी यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी सुरेश साळवे वय ३४ रा. परभणी हा मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरी आला होता. मुलांची आई कामावर गेल्यानंतर आरोपी घरात गेला. १० वर्षीय मुलगी आणि तीचा ८ वर्षाचा भाऊ घरात एकटे असल्याचा फायदा घेत दोघांवर अनैसर्गिक अत्याचार केला. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

तत्कालीन अधिकारी चेतन श्रीवंत यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटला सुरू होता. न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

सरकार पक्षातर्फे सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हवालदार शेवंता भोये आणि अभियोग कक्षाचे हवालदार डी. बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790