नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पैसे आणि दागिन्यांच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीने नोकरदार विवाहीतेस ब्लॅकमेल करीत मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहीतेचा छळ करण्यात आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पाठक यांच्या पतीसह, सासरच्या मंडळींवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरदार विवाहीतेचा २०२२ मध्ये विवाह झाला. काही काळ नाशिकला राहिल्यानंतर ती पतीसमवेत मुंबईतील बोरीवली भागात वास्तव्यास होती. दोघे पतीपत्नी नोकरीस असल्याने सासरच्या मंडळीकडून तिच्याकडे वारंवार पैश्यांची आणि दागिण्याची मागणी करण्यात आली. महिलेने त्याची पुर्तताही केली.
मात्र त्यानंतर संशयितांचा अतिरेक वाढल्याने महिलेने पैसे देण्यास टाळाटाळ केली असता पतीने तिचे निर्वस्त्र फोटो आणि व्हिडीओ काढले. छायाचित्र व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पती कडूनही पैश्यासाठी छळ वाढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितांनी मोठ्या रकमेसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक आमणे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९२/२०२४)