नाशिक: “मी इथला भाई आहे’ म्हणत दाम्पत्याच्या गाडीवर कोयत्याने हल्ला; जीवे मारण्याची धमकी

नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील महाजन हॉसिपटलच्या पाठीमागील रस्त्यावर टोळक्याने एकाच्या कारच्या पाठीमागील काचेवर कोयत्याने मारून नुकसान केले. तसेच कारमधील दाम्पत्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता२) दुपारी दोनच्या सुमारास ते पत्नीसह कारने जात होते. त्यावेळी रस्त्यात संशयित साहिल उनवणे हा हातात कोयता घेऊन “मी या परिसराचा भाई आहे” असे म्हणत परिसरात दहशत माजवित होता. त्यावेळी त्याने गांगुर्डे यांच्या कारच्या मागच्या काचेवर कोयता मारून नुकसान करीत, त्यांच्या समवेतच्या दोघा संशयितांनी कारमधील दाम्पत्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३३७/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790