नाशिक (प्रतिनिधी): पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह चार पुरुष व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित सुसऱ्या पत्नीने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, या महिलेला आरोपी पतीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून व पहिल्या पत्नीशी फारकत न घेता पीडितेसोबत दुसरे लग्न केले, तसेच ही विवाहिता मध्य प्रदेशातील रतलाम येथील सासरी राहत होती. दि. ६ जुलै २०२२ ते दि. १४ मार्च २०२४ या कालावधीत पतीसह सासू, सासरे, नणंद व मामेसासरे यांनी संगनमत करून विवाहितेला वाईटसाईट शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी करून विवाहितेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला, तसेच तिच्या अंगावरील स्त्रीधन विश्वास संपादन करून काढून घेत त्याचा अपहार केला.
वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बस्ते करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५३/२०२४)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790