LPG

एमडी ड्रग्ज तस्करी करण्याऱ्या महिलेसह तिघांना अटक; ५ लाखांचे ड्रग्ज जप्त !

नाशिक (प्रतिनिधी): स्कोडा कारमधून विक्रीसाठी नेत असलेल्या पाच लाख रुपये किंमतीचे एमडी म्हणजे मॅफेड्रॉन अमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात घेतले असून, या प्रकरणी दोघा भावांसह एकाच्या पत्नीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की फैसल शफिन शेख (वय २६), शिबान शफिन शेख (वय २५) हे दोघे भाऊ व शिबानची पत्नी हिना शिबान शेख (वय २९, सर्व रा. २१, श्रीनाथ कृपा, माहेश्वरी भवन, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड हे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कारमधून नाशिकरोड बस स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागून सत्कार पॉईंटकडे जात असताना श्रद्धा हॉटेलजवळ अमली पदार्थविरोधी पथकाने थांबवले. गाडीची झडती घेतली असता त्यात ९९.५ ग्रॅम वजनाचा सुमारे ४ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे एमडी म्हणजे मॅफेड्रॉन मिळून आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदींसह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पाथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन रुंजा गायकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790