नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर गुन्हे शाखेच्या मोटार सायकल चोरी शोध पथकाने चोरीच्या ४ मोटारसायकल जप्त करून २ चोरट्यांना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व अंमलदार मोटार सायकल चोरांचा शहरात शोध घेत गस्त करीत असतांना अंमलदार रविंद्र दिघे यांना मोटार सायकल चोरीतील संशयीत आरोपी राहुल गवारे व दर्शन वाघचौरे हे दोघे आर.टी.ओ. कार्यालय, पेठ रोड, नाशिक या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली होती.
त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी १२.३० वा. आर.टी.ओ. कार्यालय, पेठ रोड, नाशिक या ठिकाणी सापळा लावुन संशयीत आरोपी नामे हर्षल उर्फ राहुल मनोहर गवारे (वय २१ वर्षे, धंदा- चालक, रा. राजविलास सोसायटी, रूम नंबर ५, एटी. पवार शाळेच्या मागे, शिवकृपा नगर, बोरगड, नाशिक) आणि दर्शन राजेंद्र वाघचौरे (वय २५ वर्षे, रा. रूतीका हाईट्स, रूम नंबर ५०१, श्रीधर कॉलनी, पेठ रोड, नाशिक) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सुमारे एक महिन्यापुर्वी एक अॅक्टीवा मोपेड व काही दिवसांपुर्वी तीन मोटार सायकली वेगवेगळया ठिकाणावरून चोरी केल्याची माहीती दिली आहे.
त्यांच्याकडून खालील वाहने जप्त करण्यात आली आहेत: १) एक सफेद रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड नंबर MH 41 Y 4101 असा बनावट नंबर असलेला इंजिन क्रमांक JF50E80612658 आणि चेसिस क्रमांक ME4JF501LD8613738, २) एक काळया व निळया रंगाची होंडा ड्रिम युगा कंपनीची मोटार सायकल नंबर नसलेली इंजिन नंबर JC58E-T4339227 चेसीस नंबर ME4JC58BKGT033938, ३) एक काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंन्डर कंपनीची इंजिन नंबर HA10EFB-HM82519 चेसीस नंबर MBLHA10EUBIM70436, ४) एक काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंन्डर कंपनीची मोटार सायकल नंबर इंजिन नंबर 97C17E-01931 चेसीस नंबर 97CI9F01असा एकुण १,२०,०००/- रूपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहे.
सदर वाहनांचा अभिलेख पडताळणी केला असता अ.क्र. ०१ चे अॅक्टीवा मोपेड ही म्हसरूळ पोलीस ठाणे गु.र.नं. १ १९६/२०२४, भा.न्या.स. कलम ३०३ (२) या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले असुन अं.क्र. २, ३ व ४ याबाबत अभिलेख पडताळणी सुरू आहे.
आरोपी हर्षल उर्फ राहुल मनोहर गवारे याच्याविरूध्द नांदगाव पोलीस ठाणे, नाशिक ग्रमिण येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हयातील आरोपी व जप्त केलेल्या मोटार सायकल पुढिल तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त), प्रशांत बच्छाव (पोलीस उपाययुक्त गुन्हे), संदिप मिटके (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस नाईक योगेश चव्हाण, रविंद्र दिघे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी केलेली आहे.