नाशिक (प्रतिनिधी): वनविभागाने केलेल्या शासकीय कामातील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागणीकरीता विभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची धमकी देत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला फोन करत प्रकरण मिटवण्याकरिता दोन लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या माहिती अधिकारी कार्यकर्त्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अकबर पापामिया सौदागर (रा. संगमनेर) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित माहिती अधिकारी कार्यकर्ता अकबर सौदागर याने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात सोनवणे यांना फोन करत मी अकबर सौदागर बोलतो आहे. तुमच्याविरोधात मी दि. ११ ऑक्टोबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे.
पेठ वनपरिक्षेत्रामध्ये तुम्ही केलेल्या शासकीय कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी म्हणून हे उपोषण करण्यात येईल. त्यानुसार तुमची उच्चस्तरीय चौकशीही लागू शकते. यात समझोता करावयाचा असल्यास अगर प्रकरण मिटवायचे असल्यास मला २ लाख रुपये द्यावे आपण आपापसात मिटवून घेऊ असे बोलून खंडणीची मागणी केली.
सोनवणे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५६३/२०२४
![]()


