नाशिक शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच; दोन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरातील वेगवेगळया भागात झालेल्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीचा समावेश असून याप्रकरणी मुंबईनाका व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पखालरोड भागात राहणा-या सकिना आसिफ अन्सारी (रा.सात्विक रेसि.आनंदा लॉन्ड्री जवळ,पखालरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अन्सारी कुटूंबिय बुधवारी (दि.२२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा व लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

दुसरी घटना वडाळा पाथर्डी मार्गावर घडली. याबाबत ज्ञानेश सुरेश भालेराव (रा.श्री कृष्ण बंगलो,माधवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. भालेराव कुटूंबिय रविवारी (दि.१९) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद बंगल्याचे लॅच लॉक तोडून जॅग्वार कंपनीचे स्टील कोटेड नळ व मिक्सर तसेच किचनमधील नळ तांबे पितळी घरगुती वापराचे भांडे आणि देवघरातील भांडी असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790