नाशिक: पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून युवकावर कोयत्याने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): युवकाच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयातून एका तरुणाचे अपहरण करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार हाताने अडवण्याच्या प्रयत्नात हात कापला गेल्याने तरुण गंभीर जखमी झशला. घटनास्थळावरून पलायन केल्याने त्याचा जीव वाचला. पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव मार्गावर हा प्रकार घडला.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

गणेश निकम या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, मित्र साहिल जाधव, अतुल कर्डक असे तिघे दुचाकीने पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाताना संशयित सोनू सावंत, अभिजित ठोके, चिक्या घायवटे, अनिकेत मगरे, गोविंद साळवे, शुभम उमप यांनी पाठलाग करत दुचाकी थांबवली. संशयित सोनूने ‘नट्याच्या मर्डरमध्ये तू पण होता’ असे बोलून बळजबरीने दुचाकीवर बसवत सुखदेवनगरातील कापसे गल्लीतील पडक्या घराजवळ नेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

तेथे बेदम मारहाण करत नट्याला मारायला तू पण होता, आता तुझा गेम करतो, असे बोलून कोयत्याने वार केला. निकमने हाताने वार अडवला मात्र कोयत्याचा घाव हातावर लागल्याने हात कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत पलायन केल्याने जीव वाचला. वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांचे पथक तपास करत आहे. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३३९/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790