नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बजरंगवाडीत रविवारी (दि. १४) टोळीयुद्धातून घडलेल्या दंगल, तोडफोड व प्राणघातक हल्ल्यातील गुन्ह्यात आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार इरफान मन्सूर शेख (रा. पोलिस वसाहत, गंगापूर रोड) याचा प्रत्यक्ष सहभाग उघड झाला असून, एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
बजरंगवाडीत रविवारी (दि. १४) रात्री दोन गटात दंगल उसळली होती. यात दोन्ही गटातील संशयितांनी धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्यांचा वापर करत एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला हाता. त्यात बजरंगवाडी परिसरातील सराईत अभिषेक जाधव, राहुल ब्राह्मणे, नवाज खान व त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांसह खडकाळी येथील जुबिन मोहंमद सय्यद, मतीन रुबाब शेख, जफर शेख, युसुफ शेख, रजा व इतर ६ ते ७ संशयित यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यातील दोन्ही गटांमधील ८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास करताना दंगलीच्या घटनेदरम्यान अंमलदार शेख याच्या फोनवर संशयित जुबीन आणि इतरांचे अनेकदा संपर्क झाल्याचे समजल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. इरफान हा या प्राणघातक हल्ला व तोडफोडीत प्रत्यक्ष सहभागी होता, असे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790