नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. फिर्यादी भुपेश वाघेरे (२८, रा. पेठरोड) हे लघु पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत.
त्यांनी त्यांची मोटार (एम.एच. १५ जीआर ७५५०) सिंचन भवनाच्या संरक्षक भिंतीबाहेर सोमवारी (दि. १५) सायंकाळी उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरांनी पाठीमागील काच फोडून आतमध्ये ठेवलेला 9131 लॅपटॉप, चार्जर, शासकीय मोजमापाची दोन पुस्तके व अन्य कागदपत्रे असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाघेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790