LPG

नाशिक:  शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक; १२ लाखांची फसवणूक आणि मग लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार…

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवत एकाने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत शेअर मार्केट मधील गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने संशयिताने तब्बल बारा लाखास गंडा घातल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन

अजयकुमार नंदकुमार चिंचोळकर (रा.शालीमार) असे संशयिताचे नाव आहे. पिडाता व संशयिताची जानेवारी २०२२ मध्ये ओळख झाली होती. भविष्य निर्वाह निधीचे हप्ते भरण्याच्या व्यवहारातून झालेल्या या ओळखीचे रूपांतर दोघांच्या मैत्रीत झाले. यावेळी संशयिताने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेवून तुझ्याशी विवाह करेल असे आमिष दाखविल्याने हा प्रकार घडला. महामार्गावरील सेव्हन हेवन गेस्ट हाऊस येथे पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक किडनी दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्सचा गुरुवारी (दि. १२) ‘निरामय जीवन विजय सोहळा’ !

या प्रेमप्रकरणात संशयिताने पीडितेस शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास दुप्पट तीप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून ११ लाख ९० हजाराची रक्कम उकळली. गुंतवणुकीची रक्कम व परतावा पदरात न पडल्याने पिडीतेने पैश्यांचा तगादा लावला असता संशयिताने अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३२७/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790