नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दोन रो-हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चार लाखांचे दागिने चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस अली आहे. शिवांजली रो-हाऊस, ध्रुवनगर, गंगापूररोड येथे हा प्रकार उघडकीस आला. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि वैलनकेनी फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रो-हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील दोन्ही लोखंडी कपाटांचे लॉक तोडून दागिने चोरी करण्यात आले.
त्याचप्रमाणे शेजारी राहणारे ज्ञानेश्वर महाजन यांच्या रो-हाऊसमध्येही चोरी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी ध्रुवनगर येथे दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. परिसरात घरफोडींच्या प्रकारात वाढ झाली असून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.