नाशिक: मोबाईल दुकानाच्या ब्रँच मॅनेजरने केला २१ लाखांचा अपहार

नाशिक (प्रतिनिधी): एस. एस. मोबाईलच्या गंगापूर रोड शाखेतील ब्रँच मॅनेजरने विविध कंपन्यांच्या मोबाईल विक्रीतून आलेले २१ लाख रुपये जमा न करता त्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संदीप शंकरराव शिमगेकर (रा. सुयोजित वन वर्ल्ड, नाशिकरोड यांचे गंगापूर रोड येथे एस. एस. मोबाईल यांची फर्मची शाखा आहे. या शाखेत संशयित आरोपी विजय संजय बोरसे (वय ४२, रा. श्रमिकनगर, सातपूर) हा ब्रँच मॅनेजर म्हणून काम पाहतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

बोरसे याच्यावर दुकानात ठेवलेल्या मोबाईलसह इतर मालाची विक्री करण्याची जबाबदारी फिर्यादी शिमगेकर यांनी विश्वासाने सोपविली होती. आरोपी बोरसे याने दि. १४ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शॉपमध्ये असलेले सॅमसंग, ओप्पो, अॅपल, व्हिव्हो, एमआय, रिअलमी अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल व टीव्ही यांची परस्पर विक्री करून त्यांचा कुठल्याही प्रकारचा लेखाजोखा न ठेवता एकूण २० लाख ८८ हजार ७५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात ब्रँच मॅनेजर विजय बोरसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २५१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790