नाशिक: अतिशय संतापजनक घटना; पित्यानेच स्वत:च्या १३ वर्षीय मुलीवर केला अत्याचार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): घरात कोणी नसल्याची संधी साधून पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी या दि. २५ एप्रिल रोजी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. ही संधी साधून तिच्या पतीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून स्वतःच्या १३ वर्षीय मुलीला जवळ घेऊन तिच्याशी सलगी करत तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

तसेच त्याचा मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ तयार केला. “हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवीन”, अशी धमकी देऊन नराधम बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार एप्रिल महिन्यापासून सुरू होता. दरम्यान पिडीत मुलीच्या आईला पतीचा हा प्रकार समजल्यानंतर तिने म्हसरूळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

(सदर आरोपीचे नाव बातमीत टाकल्यास मुलीची तसेच कुटुंबाची ओळख उघड होऊ शकते, त्यामुळे आरोपीच्या नावाचा बातमीमध्ये उल्लेख केलेला नाही.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790