नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वडाळारोडवरील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून मिळालेल्या व्हर्चुअल क्रेडिट कार्डद्वारे ९३ लाख १ हजार रुपयांचे विमान तिकीट बुक करून परस्पर कंपनीस आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी कुमार परमसिवन नाडर यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचे अधिकारी नाडर यांच्या फिर्यादीनुसार, आयटी कंपनीत कार्यरत मयूर वाडेकर, आदिल शेख व भूषण वाघोदकर या तिघा कर्मचाऱ्यांना परकीय कंपनीमार्फत विमान तिकिटे काढण्याचा व ते रद्द करण्याचा अधिकार होता. विमान तिकीट कंपनीच्या परदेशातून येणाऱ्या व जाणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी विमानांची तिकिटे काढावी लागत असतात.
त्यासाठी परकीय कंपनी चार तासांसाठी एक व्हर्चुअल क्रेडिट कार्ड तयार करून देते. या कार्डचा वापर करून तिघे विमान तिकिटे काढत असे. याप्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात, सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैख्यवहार आणि त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत याचा शोध घेतला जात आहे.
अधिकाराचा गैरवापर:
तिघांनाही युजर आयडीसह कार्ड इश्यू करण्याचा अधिकार होता. त्याचा गैरवापर करीत तिघांनी परकीय कंपनीकडून २२९ व्हच्र्युअल क्रेडिट कार्ड काढले. त्यापैकी ११५ कार्डवरून विमान तिकिटे काढून सुमारे रे ९३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार १३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत घडला.