🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: सातपूरला बंद घर फोडून ८ लाखांचे सोने लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर कॉलनीत बंद घर फोडून घरात ठेवलेले ७ लाख ९३ हजार पाचशे रुपये किमतीचे  सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत.

ही माहिती मिळताच सातपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत श्वान पथकासह घटनास्थळावरून पुरावे सापडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कर्जवसुलीसाठी येणाऱ्या रिकव्हरी एजंटला बसणार चाप; रिझर्व्ह बँकेकडून कठोर नियमावली

रमेश नामदेव महाले यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली. संपूर्ण कुटुंब गावाला गेले होते. याचदरम्यान १९ तोळे सोन्या-चांदीचे दागिने व यासोबतच घरातील कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपूर पोलिस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790