नाशिक: चोरट्यांनी केला कहर; फ्रिजमध्ये लपविलेले दागिने केले लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जगन्नाथपुरी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंगल्यात शिरुन चोरट्यांनी सोन्याचा राणीहार, पोत, मणी, जोडवे आणि वेल असे दागिने लंपास केल्याची घटना पखालरोड परिसरात घडली.

विशेष म्हणजे, ‘फ्रिज’ मध्ये दागिने लपविले असतानाही चोरट्यांनी ते शोधून काढत चोरुन नेले. याप्रकरणी १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळागावातील रहिवाशी नरेंद्र वनवे (वय ५४) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांची बहिणी अनिता देविदास पिंगळे यांच्या राहत्या बंगल्यात ही घरफोडी झाली. अनिता व देविदास हे दोघे ३ जून रोजी रात्री साडेबारा वाजता जगन्नाथ पुरी येथे देवदर्शनासाठी रवाना झाले. त्यानंतर ५ जून रोजी मध्यरात्री एक वाजता त्यांचे जावई आशुतोष लेंडे हे पुणे येथून नाशिकमध्ये विधी परीक्षेसाठी पोहोचले. त्यांनी सासऱ्यांच्या घराचा मुख्य दरवाजा स्वतः कडील किल्लीने उघडला.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

दरम्यान, त्यावेळी घरात चोरी झालाचा संशय आल्याने त्यांनी वनवे यांना कळविले. वनवे यांनी बंगल्याची पाहणी केल्यावर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, गत महिन्यांत इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीत एका घरफोडीत वॉशिंग मशिनमध्ये लपविलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

असा झाला उलगडा:
३ जून रोजी पिंगळे दाम्पत्य जगन्नाथ पुरीला निघाले. त्यांचे जावई ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता बंगल्यात पोहोचले. त्यांनी मुख्य दरवाजा किल्लीने उघडला. तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्थ होते. कपाट आणि मागील दरवाजा उघडा होता. टेरेसवरील लोखंडी दरवाजाही उघडा होता. यासह तेथील भिंतीचा भाग तुटलेला दिसल्याने त्यांनी माम सासरे वनवे यांना कळविले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन बहिण अनिता हिला फोन केला. त्यांनी ‘फ्रिजरमध्ये दागिने ठेवलेत, ते आहे का बघ’, असे सांगितले. वनवे यांनी फ्रिजर बघितल्यावर तिथेही दागिने नव्हते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790