नाशिक: द्वारका भागात एसटी कंडक्टरसह प्रवाशाला मारहाण

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): द्वारका भागात एसटी वाहकासह प्रवाशास खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या चालकाने मारहाण केल्याची घटना घडली. बस थांबा नसतांना एसटी का थांबविली या कारणातून हा वाद झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[pt_view id=”7b61d84eo5″]

विकेश कैलासगिरी गोसावी (रा.नांदगाव बु.ता.मालेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गोसावी एस.टी. महामंडळात वाहक पदावर कार्यरत असून रविवारी (दि.५) ते नाशिक मालेगाव बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. मेळा बसस्थानकातून सुटलेली बस दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास द्वारका परिसरातील ब्रिजवर चढणा-या मार्गास लागली असता ही घटना घडली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

उड्डाणपूल चढण्यापूर्वी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका प्रवाश्याने हात दाखविल्याने चालकाने बस थांबविली. यावेळी गोसावी यांनी दरवाजा उघडून प्रवाश्यास बसमध्ये घेत असतांना तेथे उभ्या असलेल्या एमएच १५ एचसी ५५१३ या खासगी प्रवासी वाहतूक करणा-या इको वाहनावरील अज्ञात चालकाने आरडाओरड करीत त्यांना शिवीगाळ केली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

एसटीचा येथे थांबा नसतांना तुम्ही येथे बस का थांबविली याबाबत जाब विचारत संशयिताने शिवीगाळ सुरू केल्याने गोसावी त्यास समजून सांगत असतांना त्याने धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवासी प्रकाश नांदकर हे वाहक गोसावी यांच्या मदतीस धावून गेले असता त्यांनाही मारहाण करीत संशयिताने शिवीगाळ केले. या हाणामारीत गोसावी यांचे कपडे फाडत संशयिताने लोखंडी वस्तू मारून फेकली मात्र गोसावी यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविल्याने अनर्थ टळला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790