नाशिक: परदेशात जाण्यासाठी पैशांवरून विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

नाशिक। दि. ५ मार्च २०२६: परदेशात जाण्यासाठी पैशांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिंडोरी रोड परिसरात घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 6 मार्च रोजी आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पतीला ‘मला परदेशात कधी नेणार?’ अशी विचारणा केली असता पैशांवरून वाद निर्माण झाला. यानंतर पतीने ‘फॉरेनला जाण्यासाठी पैसे देत नाहीस’ असा आरोप करत तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पतीसह जेठ आणि इतर सासरच्या मंडळींनी दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील घरात महिलेला मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पती स्वतः परदेशात निघून गेल्याने आपल्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक मयुरी तुरे या पुढील तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790