
नाशिक (प्रतिनिधी): खाद्यपदार्थ घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करत धारदार शस्त्राने मारहाण करून ८०० रुपयांची रोख रक्कम, तर ५००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेणाऱ्या संशयितास अखेर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्यादी राज शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ऑर्डर दिलेले खाद्यपदार्थाचे पार्सल घेऊन सागर जाधव यांच्या पत्त्यावर गेले. तेथे सागर जाधव व त्याचे तीन मित्र बाबा, आजू, दुर्गेश यांनी शिवीगाळ केली. धारदार शस्त्राचे वार करून खिशातील रोख रक्कम ८०० रुपये व फोन बळजबरीने घेतला. ठार मारण्याची धमकी देऊन ५००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.
या गुन्ह्यातील संशयित अवधूत जाधव (२४) याचा शोध घेतला जात होता. पोलिस हवालदार प्रशांत मरकड, पोलिस नाईक विशाल देवरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अवधूत जाधवला एमजीरोड भागातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला म्हसरुळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, विशाल काठे, पोलीस नाईक: विशाल देवरे, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने केली.
![]()


