
नाशिक। दि.२५ मार्च २०२६: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. पंचवटी पोलिसांनी कुमावतनगर पाटाजवळ ही कारवाई केली. कुणाल महेंद्र चव्हाण (१९, रा. क्रांतीनगर, मखमलाबादरोड) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी माहिती दिली. गुन्हे शोध पथक गस्त करत असतांना पथकाचे अंकुश काळे यांना माहिती मिळाली. काळ्या
रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स घातलेला तरुणाकडे गावठी कट्टा असून, तो कुमावतनगर पाटाच्या पुढे असल्याचे सांगितले. पथकाने सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये गावठी कट्टा, रिकामी मॅगझिन मिळून आले. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सतीश शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

