नाशिक: नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला अटक; २४ हजार रुपयांचा मांजा जप्त !

नाशिक। दि. २३ डिसेंबर २०२५: शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २३ डिसेंबर २०२५) जुने नाशिक परिसरात करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार संदीप भांड व प्रदीप म्हसदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार अजमेरी मशिदजवळील चव्हाटा, जुने नाशिक येथील मोकळ्या जागेत आडोश्याला एक इसम पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याचे समोर आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. कारवाईदरम्यान एका व्यक्तीस हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीतून नायलॉन मांजाची विक्री करताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव अजिम मोहम्मद इकबाल शेख (वय ४०, रा. अजमेरी मशिदजवळ, चव्हाटा, नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे २४ गट्टू जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत सुमारे २४ हजार रुपये आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, अंमलदार: मुक्तार शेख, उत्तम खरपडे, महिला पोलीस हवालदार शर्मीला कोकणी, मनिषा सरोदे, सुकाम पवार यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790