
नाशिक। दि. २० डिसेंबर २०२५: इलेक्ट्रिकल वाहन शोरूममधून ३ मोपेड चोरी करुन विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शिवाजीनगर धर्माजी कॉलनी येथे ही कारवाई केली. योगेश परशराम शिंदे (रा. श्रमिकनगर, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोपेड जप्त करण्यात आल्या.
पथकाचे मनोहर शिंदे, महेश खांडबहाले यांना माहिती मिळाली की, योगेश शिंदे इलेक्ट्रिकल मोपेड विक्री करत आहे. पथकाने बनावट ग्राहक बनत सापळा रचला. मोपेडच्या किंमतीबाबत विचारणा केली. शो रुमच्या किंमतीत मोपेड विक्री करत असल्याचे समजले. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता सातपूर येथील एका इलेक्ट्रिकल मोपेड विक्रेत्या शोरुममधून ३ मोपेड चोरी केल्याची कबुली दिली. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सातपूर येथील शोरूम मधून ८ सप्टेंबर रोजी कंपनीच्या वर्कशॉप व गोदामात ग्राहकांना विक्रीस ठेवलेल्या मोपेडपैकी ३ मोपेड संशयिताने चोरी केल्या होता. दोन महिने मोपेड लपवून ठेवत त्याने आदित्य कॉम्पलेक्सच्या पार्किंगमध्ये मोपेड विक्रीकरता उभ्या केल्या. दोन ग्राहकांकडून अगाऊ रक्कम घेतली होती. वाहने विक्री होण्यापूर्वी पथकाने त्याला अटक केली.
![]()

