नाशिक। दि. १३ डिसेंबर २०२५: दुचाकी चोरी करून पाच वर्षांपासून फरार झालेल्या अट्टल दुचाकी चोरट्याला शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने नैताळे (ता. निफाड, जि. नाशिक) सापळा रचून अटक केली. गणेश सुरेश पिंपळे (३०), रा. तास दिंडोरी, शिवरेफाटा, ता. निफाड, जि. नाशिक) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
नाशिक शहर पोलिस गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेतला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत असताना नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला संशयित गणेश पिंगळे हा निफाड तालुक्यातील नैताळे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यास नाशिक शहरात आणून वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने कारवाई केली.
![]()
