नाशिक। दि. ६ मार्च २०२६: सातपूर परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ ला यश आले आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ११५ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सुमारे ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यातून संशयित एमएच ०२ ए.वाय. ५८३१ क्रमांकाच्या कारचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड लिंक रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारसह आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नागेश्वर चिंतामण पालवे (३४, रा. पिंपरी, ता. त्र्यंबकेश्वर), आकाश चंद्रकांत जाधव (२९, रा. सातपूर), सुमित सुरेश नेटावटे (२६, रा. सातपूर) आणि प्रकाश दशरथ तपासे (३६, रा. वीर बाबाचौक, गौळाणे, ता. जि. नाशिक) यांचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ चे उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे व त्यांच्या पथकाने केली.
![]()

