नाशिक: शहरातील सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील सराईत गुन्हेगार आणि खासगी सावकारी करणाऱ्या संदेश काजळे याची त्याच्याच मित्रांनी जाळून टाकत हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना मोखाडा पोलिसांच्या हद्दीत घडली असून, तो मद्याच्या नशेत असताना मारेकरी मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोर मारहाण करुन इकाे गाडीतून अपहरण करत मोखाडा येथे नेऊन हत्या केल्याचे उघड झाले आहे.

त्यानंतर मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, गुन्हेशाखा युनिट एकने या प्रकरणात मुख्य सूत्रधार स्वप्निल उन्हवणे याला गुन्ह्यात वापरलेल्या इको कारसह चोवीस तासांत अटक केली आहे…

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

याबाबत अधिक माहिती अशी की, संदेश चंद्रकांत काजळे (वय ३५ रा. माताजी चौक, विजयनगर, सिडको) असे मृत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, अँट्रोसिटीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल होते. ९ फेब्रुवारी रोजी रात्री संदेश काजळे हा पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या या हॉस्पिटलच्या मागील पार्किंमध्ये आला असता त्याचे संशयित मित्र नितीन उर्फ पप्पू चौगुले (रा. ड्रीम कॅस्टल मागे, मखमलाबाद रोड), रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे (वय २३, दोघे रा. राजवाडा, पंचवटी), पवन भालेराव (रा. त्र्यंबकेश्वर, राजवाडा) आणि इतरांत आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले. यानंतर काजळेस मारहाण करुन त्याला कारमध्ये ढकलून अपहरण केले. यासंदर्भाने प्रितेश काजळे याने पाच जणांविरुद्ध पंचवटी पोलिसांत चुलतभावाचे अपहरण केल्याची तक्रार दिली.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच, रविवारी(दि.११) रोजी पहाटे मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळे याचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला. काजळे याच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्याची माहिती व त्याचे वर्णन हुबेहुब काजळे याच्याशी जुळत असल्याने मोखाडा पोलिसांनी शहर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी आणि गुन्हेशाखा युनिट एकने समांतर तपास केला. तेव्हा युनिट एकला संशयित उन्हवणे हा इको कारसह त्र्यंबक भागात असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने पथकाने सापळा रचून उन्हवणे यास अटक केली. तर उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे. या अपहरणसंदर्भाने मृत काजळे याचा चुलत भाऊ प्रितेश काजळे याच्या फिर्यादीनुसार पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, खुनाचा प्रकार उघड झाल्याने याच अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790