नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी चोरी करणारे आणि चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. पथकाचे विशाल काठे यांना माहिती मिळाली दुचाकी चोरी करणारे दोघे रामवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा स्चला असता संशयित काळ्या रंगाच्या मोपेडहून येताना दिसले.
दोघांना थांबवत चौकशी केली असता अभिजित राऊत, विजय रेड्डी अशी त्यांनी नावे सांगितली. दोघांची चौकशी केली असता श्याम ओढेकर, कुणाल सोनवणे यांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दुचाकी राजेश साळी या भंगार विक्रेत्यास विक्री केल्याचे सांगितले. पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.