नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत राउंड जप्त करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने कथडा येथे ही कारवाई केली. मुज्जफर उर्फ मज्जू मैनोद्दीन शेख (रा. कथडा) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या चौकशीत आवेश उर्फ अव्वा निसार शेख याचे समोर आले. त्याच्या घरझडती दोन गावठी पिस्तुल, पाच राउंड जप्त केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे विशाल देवरे यांना माहिती मिळाली सराईत गुन्हेगार मज्जू शेख हा कथडा येथे येणार आहे. पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत आवेश उर्फ अव्वा शेख याचे नाव समोर आले.
पथकाने संशयिताच्या चौक मंडई येथील घरातून ताब्यात घेतले त्याच्या कडून दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत राउंड जप्त केले. वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड, रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित घातपात करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असून पथकाकडून तपास सुरू आहे.